मृणाल ठाकूर आणि अभिमन्यू दसानी हे लवकरच आंख मिचोली या चित्रपटात एकत्र दिसून येणार आहेत. निर्मात्यांनी मागील आठवड्यात याचे पोस्टर जारी केले होते. निर्मात्यांनी आता याचा ट्रेलर जारी करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढविली आहे. उमेश शुक्ला यांनी यापूर्वी ‘ओएमजी : ओह माय गॉड’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. शुक्ला यांनीच आंख मिचोली या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपट उत्तम कलाकारांसोबत एक मनोरंजक प्रवास घडविणारा असणार आहे.
एका भारतीय विवाहसोहळ्याच्या अवतीभवती फिरणारा हा चित्रपट दोन कुटुंबांमधील वेडेपणा दर्शवणारा आहे. येथे तुमच्या डोळ्यांसाठी एक छोटीशी मेजवानी आहे, पूर्ण कुटुंबासाठी मौजमस्तीने भरलेल्या उत्तम मनोरंजनासाठी तयार रहा. आंख मिचोलीचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यात जे दिसते त्याहून अधिक चित्रपटात पहायला मिळेल असे मृणालने म्हटले आहे. चित्रपटात मृणाल ठाकूर, अभिमन्यू दसानीसोबत परेश रावल, शरमन जोशी, दिव्या दत्ता, अभिषेक बॅनर्जी, दर्शन जरीवाला, ग्रुशा कपूर आणि विजय राज देखील मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.