अभिनेता नानीसोबत जमणार जोडी
मृणाल ठाकूर लवकरच तेलगू अभिनेता नानीसोबत ‘हाय नन्ना’ या चित्रपटात दिसून येणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी मृणालच्या या आगामी चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. हा चित्रपट इमोशनल फॅमिली एंटरटेनर धाटणीचा असणार आहे. चित्रपटाचे चित्रिकरण हैदराबादमध्ये सुरू आहे.
नानीने काही दिवसांपूर्वी चित्रपटाची झलक दाखविणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ही मुलगी मला नन्ना अशी हाक मारते असे नमूद करत नानी यांनी या चित्रपटाचे नाव जाहीर केले होते. या चित्रपटाच्या हिंदी डबचे नाव हाय पापा असे ठेवण्यात आले आहे. चित्रपटात नाती एका मुलाच्या वडिलांची भूमिका साकारत आहे.
हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी हिंदी, तेलगू, तमिळ आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटची निर्मिती मोहन चेरुकुरी आणि डॉ. विजेंद्र रे•ाr टीगला यांनी केली आहे. चित्रपटाद्वारे शौर्यव हे दिग्दर्शक म्हणुन पदार्पण करत आहेत. तर हेशम अब्दुल वहाब यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. मृणाल ठाकूर यापूर्वी सीता रामम या दाक्षिणात्य चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळाले हेते. यामुळे मृणालचा दक्षिणेत आता मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.