नियामक फाइलिंगमध्ये माहिती सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तोट्यात चाललेली सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) सरकारी हमी कर्जरोख्यांद्वारे 3,126 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. कंपनीने दाखल केलेल्या नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती समोर आली आहे.
एमटीएनएलने सांगितले की बॉण्ड्समधून 3,126 कोटी रुपये उभारण्यासाठी भागधारकांची मंजुरी आवश्यक आहे. 2022 मध्ये, मंत्रिमंडळाने बीएसएनएल आणि एमटीएनएलसाठी 1.64 लाख कोटी रुपयांचे दुसरे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले होते.
या वर्षी जानेवारीपर्यंत, एमटीएनएलवर एकूण 28,581 कोटी रुपयांचे कर्ज होते. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार, 2023-24 आर्थिक वर्षात कंपनीला 2,808 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा होणे अपेक्षित आहे.
यासंबंधी आगामी म्हणजेच 29 सप्टेंबरला संचालक मंडळाची बैठक होत असून त्यामध्ये याविषयी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सॉवरेन गँरंटी बाँडच्या माध्यमातून सदरची वरील रक्कम उभारली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. जुलै 2022 मध्ये एमटीएनएलवरच्या तोट्याचा भार कमी करण्यासंबंधात चर्चा करण्यात आली होती.