वृत्तसंस्था/ ऍडलेड
डब्ल्यूटीए टूरवरील येथे रविवारपासून सुरू झालेल्या ऍडलेड खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत बिनाका अँड्रेस्क्यूने माजी टॉप सिडेड स्पेनची मुगुरुझाचा पराभव केला.
या सामन्यात अँड्रेस्क्यूने मुगुरुझावर 0-6, 7-6(7-3), 6-1 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. अन्य एका सामन्यात इस्टोनियाच्या कॅनेपीने सेसनोविचचा 4-6, 6-1, 6-4 असा पराभव केला.
डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या ऑकलंड क्लासिक आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेला ऑकलंडमध्ये मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. डब्ल्यूटीए टूरवरील या 250 दर्जाच्या स्पर्धेत अमेरिकेचे टॉप सिडेड महिला टेनिसपटू कोको गॉफचे पुनरागमन होत आहे. 16 ते 29 जानेवारी दरम्यान मेलबर्न येथे होणाऱया ऑस्ट्रेलिया न ग्रँडस्लॅम स्पर्धेत टेनिस स्पर्धेपूर्वीची ही शेवटची सरावाची स्पर्धा आहे. ऑकलंड स्पर्धेत व्हिनस विलियम्स, सोफिया किनेन इमा रॅडुकानू आणि स्लोअन स्टिफेन्स सहभागी होत आहेत.