शिवलीलाताई पाटील यांचे 28 रोजी कीर्तन
वार्ताहर /धामणे
देसूर येथे श्री सातेरी माउली यात्रेनिमित्त गुरुवार दि. 28 रोजी श्री बालाजी स्पोर्ट्स ग्रुप देसूर यांच्यावतीने आयोजित कीर्तन सोहळय़ाच्या मुहूर्तमेढचे पूजन रविवार दि. 24 रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हभप शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाचा सोहळा दि. 28 रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे. याप्रसंगी बालाजी ग्रुपचे व्यंकटेश पाटील, हभप भरमाणी पाटील, रमेश नंद्याळकर, सुनील पाटील, यशवंत गुरव, हभप सुभाष परीट, भुजंग गुरव, बाबाजी पाटील तसेच वारकरी व भजनी मंडळ आणि नागरिक उपस्थित होते.