प्रतिनिधी/बेळगांव: आगामी बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशना दरम्यान उत्तर मतदारसंघात नव्याने बांधलेल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
बिम्सच्या आवारात नव्याने बांधण्यात येणाऱ्या माता व बाल रुग्णालय व ट्रॉमा सेंटरचा पायाभरणी समारंभ तसेच जुने नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृहाच्या पुनर्बांधणीसाठी आर्थिक मदतीची विनंती केली असता, सर्व मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला आहे. येत्या अधिवेशन दरम्यान या सर्व कामांचे उद्घाटन व पायाभरणी समारंभास मान्यता दिली असल्याची माहिती उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी दिली आहे.