ऑनलाईन टिम : मुंबई
मुंबई गुरुवारी स्वयंपाकाच्या गॅस एलपीजीच्या किमती या महिन्यात दुसऱ्यांदा ३.५ रूपयांनी वाढल्या, ज्यामुळे देशभरातील एलपीजी सिलिंडरच्या किमती १००० रूपयांच्यावर गेल्या आहेत.
आजपासून १४.५ किलोचे घरगुती एलपीजी सिलिंडर दिल्ली आणि मुंबईत १००३ रूपयांना उपलब्ध होतील. कोलकातामध्ये १०२९; तर चेन्नईमध्ये त्याची किंमत १०१८.५ रूपये असेल.
१९ मे पासून घरगुती LPG सिलिंडरच्या किमती दिल्ली- १००३, मुंबई- १००२, कोलकाता- १०२९, चेन्नई-१०१८.५ रूपये अशा असतील.
यापूर्वी ७ मे रोजीही गॅसच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती, ज्यामुळे राष्ट्रीय राजधानी वगळता अनेक शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीने १००० चा टप्पा ओलांडला होता. मात्र, आजच्या दरवाढीनंतर दिल्लीनेही हा टप्पा ओलांडला आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, गेल्या वर्षभरात दिल्लीतील घरगुती एलपीजी सिलिंडर ८०९ रुपयांवरून १००० रुपयांवर गेला आहे.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारने मे २०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासूनची हि झालेली सर्वाधिक वाढ आहे. रशिया -युक्रेन युद्धाच्या पार्र्श्वभूमीवर, इंधनाच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे ही वाढ दिसून येते.