महसुलापासून वंचित : शहरातील अनधिकृत बॅनरवर कारवाईची गरज
बेळगाव : शहरात अनधिकृत बॅनर्स, फ्लेक्स, जाहिराती आणि होर्डिंग्जवर कारवाई केली जात आहे. या अनधिकृत बॅनर्स आणि फ्लेक्समधून कंपनीला वर्षाकाठी कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळू लागला आहे. मनपाला मात्र महसुलापासून वंचित राहावे लागत आहे. शहरात मोठ्या ठिकाणी अनधिकृत बॅनरमुळे मनपा प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे. मनपा व्याप्तीतील 58 प्रभागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी विविध संघटना, राजकीय पक्ष, इतर संघटना परवानगी न घेताच सभा, समारंभ, वाढदिवस, शुभेच्छांचे फलक व बॅनर लावत आहेत. त्यामुळे मनपाच्या महसुलावर परिणाम होऊ लागला आहे. बॅनर, फ्लेक्सच्या माध्यमातून मनपाला वार्षिक कोट्यावधीचा महसूल प्राप्त होतो. मात्र अनधिकृत बॅनरमुळे या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. अनधिकृत जाहिरातींच्या बॅनर्समुळे मनपाला दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा फटका बसू लागला आहे. अनधिकृत बॅनर लावून महसूल बुडविणाऱ्यांवर कारवाई करण्यास मनपा अतिक्रमण विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कॉलेज रोड, यंदेखूट, आरपीडी कॉर्नर, गोवावेस, गांधीनगर, सांबरा रोड, चन्नम्मा सर्कल, आरटीओ सर्कल, पिरनवाडी, आझमनगर, सदाशिवनगर, जिल्हा रुग्णालय आवार, बाजारपेठ आदी ठिकाणी परवानगी न घेताच बॅनर आणि फ्लेक्स लावण्यात आले आहेत. अशांवर कारवाई होणे गरजेचे आहे. शिवाय अनधिकृत बॅनरमुळे मनपालादेखील फटका बसू लागला आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी आणि मुख्य रस्त्यांवर अनधिकृत बॅनर्स आणि फ्लेक्स लावले जात असल्याने शहराच्या सौंदर्यालादेखील बाधा येऊ लागली आहे. विशेषत: राजकीय लोकांकडून बॅनर्स आणि फ्लेक्स लावले जात आहेत. त्यामुळे मनपाचे उत्पन्नही बुडू लागले आहे. परवानगी न घेताच लावलेल्या बॅनर्सची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
अनधिकृत बॅनर काढण्याचे निर्देश
मनपा व्याप्तीत अनधिकृत बॅनर लावण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांचे फ्लेक्स परवानगी न घेताच लावले आहेत. मात्र हे अनधिकृत बॅनर काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दररोज 100 रुपये भाडे ठरविण्यात आले आहे. परवानगीशिवाय बॅनर, फलक शहरात लावता येणार नाहीत.
– डॉ. रुद्रेश घाळी(मनपा आयुक्त)