राजस्थानला जाणाऱया प्रवाशांना होणार सोयीस्कर
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाकाळात बंद असलेली म्हैसूर-उदयपूर हमसफर एक्स्प्रेस सोमवार दि. 11 पासून पुन्हा धावणार आहे. या साप्ताहिक एक्स्प्रेसमुळे बेळगावमधील प्रवाशांना राजस्थानला जाणे सोयीस्कर ठरणार आहे. बेळगाव परिसरात अनेक राजस्थानी नागरिक असल्यामुळे त्यांना ये-जा करणे आता सोयीचे होणार आहे.
उदयपूर सिटी ते म्हैसूर (रेल्वे क्र. 19667) एक्स्प्रेस सोमवारी रात्री 9.15 वा. उदयपूर येथून निघणार आहे. दुसऱया दिवशी रात्री 2 वा. बेळगाव तर बुधवारी दुपारी 4.35 वा. म्हैसूर येथे पोहोचणार आहे. म्हैसूर-उदयपूर सिटी (रेल्वे क्र. 19668) एक्स्प्रेस म्हैसूर येथून गुरुवारी सकाळी 10 वा. निघणार आहे. रात्री 10.50 वा. बेळगावला पोहोचणार असून, शनिवारी पहाटे 3.35 वा. उदयपूर येथे पोहोचणार आहे. या रेल्वेला एकूण 20 डबे जोडण्यात आले आहेत. या एक्स्प्रेसला बेंगळूर, दावणगेरी, हुबळी, बेळगाव, मिरज, पुणे, वसई रोड, सूरत, वडोदरा, रत्लाम, माण्डसूर यासह इतर थांबे असणार आहेत.