N. M. Suyash of Ottawane High School in M.S Examination
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २१ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या एन एम एम एस परीक्षेत ओटवणे येथील श्री रवळनाथ विद्यामंदिर या प्रशालेच्या इयत्ता ८ वी व १० वीतील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.
या परीक्षेत या प्रशालेतील कु. तन्वी ज्ञानेश्वर गावकर ९८.८९℅, कु. साक्षी सखाराम गावकर ९८.८६℅, कु. रिया संतोष सावंत ९१.६८℅, कु. वैष्णवी विजय तावडे ८६.५२℅, कु. अर्जुन दिलीप वारंग ८६. ४८℅, कु.अनन्या आनंद गावकर ८०.४०℅, कु. श्रेयस सखाराम शृंगारे ७७.२२℅, कु. स्वाती पांडुरंग जाधव ७४.१६℅, कु. आर्या सोनू काटाळे ७४.०८℅, कु. समीक्षा दशरथ नाईक ७२.०६℅. आदी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, सहाय्यक शिक्षक इ. डी. धोंगडे, एन. व्ही. राऊळ, पी. एम्. कांबळे व श्रीम. एस. एस. गवस यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वामन कविटकर, उपाध्यक्ष बाबाजी गावकर, सचिव राजाराम वर्णेकर, कोषाध्यक्ष मनोहर मयेकर यांनी अभिनंदन केले आहे.
ओटवणे प्रतिनिधी