वृत्तसंस्था/ बेंगळूर
कर्नाटकाच्या रणजी संघातील दोन महत्त्वाचे क्रिकेटपटू करुण नायर आणि श्रेयस गोपाल आता अनुक्रमे विदर्भ आणि केरळ रणजी संघातून खेळणार आहे. करुण नायर आणि श्रेयर गोपाल यांनी कर्नाटकाला निरोप दिला आहे. सदर माहिती कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या प्रवक्त्याने दिली आहे. नायर आणि गोपाल यांना दुसऱ्या संघांकडून खेळण्यासाठी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेकडून ना हरकत प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
करुण नायरने यापूर्वी कर्नाटक रणजी संघाचे नेतृत्त्व केले होते. कर्नाटक संघाकडून खेळताना त्याने 11 शतके आणि 16 अर्धशतके प्रथमश्रेणी सामन्यात नोंदविले आहेत. 2014-15 च्या रणजी हंगामात करुण नायरने तामिळनाडू विरुद्ध आपली सर्वोच्च 328 धावांची खेळी केली होती. 2022 च्या जूनमध्ये कर्नाटकाला करुण नायरच्या गैरहजेरीत दोन नवीन क्रिकेटपटू उपलब्ध झाले. निकीन जोस आणि विशाल वोनेत या नवोदित क्रिकेटपटूंनी 2022-23 च्या रणजी हंगामात दर्जेदार कामगिरी केली आहे. जोसने 13 डावात 547 धावा जमविल्या आहेत. निकीन जोसने 13 डावामध्ये 49.72 धावांच्या सरासरीने 547 धावा जमविल्या आहेत.