आनंद एल. राय यांच्या चित्रपटात नवोदितांना संधी
रांझणा, तनु वेड्स मनु यासारखे उत्तम चित्रपट तयार केलेले बॉलिवूडचे प्रख्यात दिग्दर्शक आनंद एल. राय हे एका नव्या चित्रपटाची तयारी करत आहेत. त्यांनी स्वत:च्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘नखरेवाली’ निश्चित केले आहे. या चित्रपटाद्वारे राय हे बॉलिवूडमध्ये दोन नव्या चेहऱ्यांना लाँच करणार आहेत.
नखरेवाली चित्रपटात अंश दुग्गल आणि प्रगती श्रीवास्तव हे दोन नवे चेहरे दिसून येणार आहेत. दोन्ही कलाकार स्वत:च्या पदार्पणावरून उत्सुक आहेत. राय यांनी सोशल मीडियावर नखरेवाली चित्रपटाशी संबंधित एक व्हिडिओ शेअर करत नवोदित कलाकारांची माहिती दिली आहे. अनोख्या कहाणीची अनोखी तयारी असे म्हणत राय यांनी अंश दुग्गल अन् प्रगती श्रीवास्तव यांचा चेहरा जगासमोर सादर केला आहे.
आनंद एल राय यांच्या कलर येलो प्रॉडक्शन्स आणि जियो स्टुडिओजद्वारे हा चित्रपट निर्माण केला जाणार आहे. आनंद एल राय यांच्या नव्या चित्रपटाच्या घोषणनेनंतर त्यांचे चाहते अत्यंत उत्सुक दिसून येत आहेत.