चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक 4284 अर्ज
कोल्हापूर/प्रवीण देसाई
जिह्यात मयत, दुबार असलेल्या 18 हजार 811 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून सुऊ असलेल्या निरंतर मतदार पुनर्रिक्षण मोहिमेंतर्गत याचे अर्ज जिल्हा निवडणूक विभागाला प्राप्त झाले आहेत. यावर निवडणूक विभागाकडून पुढील कार्यवाही होऊन ही नावे वगळली जाणार आहेत. यामध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक 4284 अर्जांचा समावेश आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिह्यात मतदार पुनर्रिक्षण मोहीम सुऊ आहे. या मोहिमेंतर्गत 1 जानेवारी ते 23 मार्च या कालावधित नवीन नाव नोंदणी, नावे वगळणे, नाव व वयात दुऊस्तीचे अर्ज जिल्हा निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले आहेत. यामध्ये क्रमांक-7 चे नाव वगळण्याचे 18 हजार 811 अर्जांचा समावेश आहे. यात सर्वाधिक चंदगड विधानसभा मतदारसंघातील 4284 अर्ज आहेत. त्याचबरोबर राधानगरी मतदारसंघातील 1093, कागल मतदारसंघातील 1449, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील 2729, करवीर मतदारसंघातील 2139, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील 2695, शाहुवाडी मतदारसंघातील 3198, हातकणंगले मतदारसंघातील 985, इचलकरंजी मतदारसंघातील 139 व शिरोळ मतदारसंघातील 100 अर्ज प्राप्त झाले आहेत. नावे वगळण्यासाठी ‘बीएलओ’ यांच्यामार्फत पडताळणी होईल. आवश्यकता वाटल्यास मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यासमोर सुनावणी घेतली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.
जिह्यात 24 हजार जणांच्या नाव-वयात होणार दुरुस्ती
निरंतर मतदार पुनर्रिक्षण मोहिमेंतर्गत जिह्यात 23 हजार 821 मतदारांच्या नाव व वयात दुऊस्तीचे अर्ज जिल्हा निवडणूक विभागाला प्राप्त झाले आहेत. यामध्ये सवार्धिक चंदगड विधानसभा मतदारसंघातील 5277 अर्ज आहेत. त्याचबरोबर राधानगरी मतदारसंघातील 2514, कागल मतदारसंघातील 3218, कोल्हापूर दक्षिण 1757, करवीर मतदारसंघातील 3463, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील 1125, शाहूवाडी मतदारसंघातील 3224, हातकणंगले मतदारसंघातील 1045, इचलकरंजी मतदारसंघातील 1329, शिरोळ मतदारसंघातील 869 अर्ज प्राप्त झाले आहेत.
नवीन मतदार नोंदणीचे सर्वाधिक 3749 अर्ज ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये
निरंतर मतदार पुनर्रिक्षण मोहिमेंतर्गत जिह्यात 15 हजार 811 नवमतदारांच्या नोंदणीचे अर्ज जिल्हा निवडणूक विभागाला प्राप्त झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 3749 अर्ज, त्याचबरोबर चंदगड मतदारसंघातील 1201, राधानगरी मतदारसंघातील 1307, कागल मतदारसंघातील 969, करवीर मतदारसंघातील 1230, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील 936, शाहूवाडी मतदारसंघातील 825, हातकणंगले मतदारसंघातील 2124, इचलकरंजी मतदारसंघातील 1858, शिरोळ मतदारसंघातील 1612 अर्जांचा समावेश आहे.