वार्ताहर /नंदगड
नंदगड येथे आयोजित झोनल लेवल स्पर्धेमध्ये नंदगड कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. यामध्ये 3 कि. मी. चालणेमध्ये अंकिता पाटील प्रथम, सौंदर्या देंगावकर द्वितीय, उंच उडीमध्ये सिद्धी केळवेकर प्रथम, ट्रिपल जम्पमध्ये, अंकिता पाटील द्वितीय, संगीता भुजगुरव तृतीय क्रमांक मिळविला.
भालाफेकमध्ये नेहा पाटील द्वितीय, अर्चना पाटील तृतीय, 14 वर्षाखालील क्रीडा स्पर्धामध्ये लांब उडी आणि 200 मी. धावणे या दोन्ही स्पर्धेमध्ये मिताली झुंजवाडकरने प्रथम क्रमांक तर उंच उडी व 400 मी. धावणे या दोन्ही स्पर्धेमध्ये श्रद्धा पाटीलने प्रथम क्रमांक पटकावला. यशस्वी स्पर्धकांना हायस्कूलचे मुख्याध्यापक, शारीरिक शिक्षक व अन्य शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.