वार्ताहर/ पालये
इंडियन एज्युकेशनल एड फाऊंडेशन भूमिका टेक्निकल इन्स्टिटय़ूटमध्ये नाताळ साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच रंजना राजन परब, प्राचार्य यशवंत नाईक, भूमिका इंग्लिश स्कूलचे मॅनेजर राजेश परब यांची उपस्थिती होती. याशिवाय उपस्थितांमध्ये विविध ट्रेडचे प्रशिक्षक गुरुदास गडेकर, वॅलेंकिनी डिसोझा, सिद्धेश मोरजकर, रसिका दाभोलकर, झेवियर मस्कारेन्हास, प्रियांका काळोजी, दीपाली केरकर, ज्योत्स्ना तिळवे तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
यावेळी कार्तिक तांडेल याने सांताक्लॉज भूमिका वठवली. विद्यार्थी सिद्धेश याने तयार पेलेला केक कापून यावेळी येशूख्रिस्त जन्मदिन साजरा करण्यात आला. वॅलेंकिनी डिसोझा, झेवियर मस्कारेन्हास यांनी यावेळी कॅरोल गीत सादर केले. झेवियर मस्कारेन्हास यांनी येशूख्रिस्त जन्मदिनाचे महत्त्व विषद केले. विद्यार्थिनी संजना शेटकर, राधिका नाईक, सिया भगत यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे गुलाबपुष्पे देऊन स्वागत केले. फॅशन डिझायनच्या विद्यार्थिनी सेजल, आर्विन तसेच नॅल्सा, वालंका तसेच सान्वी सागर तिळवे यांनी यावेळी विविध गीतांवर आधारित नृत्य सादर केले. उपस्थितांसाठी यावेळी प्रश्नोत्तराच्या स्पर्धाही घेण्यात आल्या. यात मच्छींद्रनाथ कायसूकर (मोटर मॅकनिक ट्रेड), गुरुदास गडेकर (प्लंबर ट्रेड) यांना बक्षिसे देण्यात आली. नृत्यासाठी सान्वी तिळवे हिलाही बक्षीस देण्यात आले. सरपंच रंजना परब यांनी यावेळी नाताळच्या शुभेच्छा दिल्या. दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, यावेळी विद्यार्थ्यांसाठी नक्षत्र बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. याचे परीक्षण रंजना परब, राजेश परब यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी आकर्षक गोठाही बनविला होता.