गुरूपौर्णिमादिनी महिला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय, प्रदेश, जिल्हा व निरीक्षकांचा मेळावा : लोकसभेत व विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षणाची गुरुंकडे मागणी : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या सभागृहात कार्यक्रम संपन्न
वार्ताहर / वेंगुर्ले
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे गुरुपौर्णिमा दिनी महिला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय, प्रदेश, जिल्हा पदाधिकारी व निरीक्षक यांच्या आयोजीत केलेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गुरूवंदना दिली. यावेळी लोकसभेत व विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण कायद्याने करून महिलांचा सन्मान उंचवावा अशी मागणी करण्यांत आली.
गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून आयोजित करण्यांत आलेल्या गुरूवंदनाच्या कार्यक्रमांस राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,खासदार सुनिल तटकरे, आमदार एकनाथ खडसे आदी जेष्ठ मान्यवर या कार्यक्रमांस उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना महिलांना प्रत्येक निवडणुकित 33 टक्के आरक्षण दिले. महिलांना कायद्याने दिलेल्या अधिकारामुळे महिलांचे मनोध्येर्य वाढलेले आहे. त्यास आज 28 वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे महिलांचा राजकारणांत सन्मान वाढला. तसेच त्यापुढेही जात महिलांना 50 टक्के आरक्षण धोरण संमत करून महिलांना पुरूषांच्या बरोबरने न्याय दिला. अशी महनीय व्यक्ती असेलेल्या शरद पवार यांना खासदार सुप्रिया सुळे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, प्रदेश अध्यक्षा विद्या चव्हाण, प्रदेश सचिव नम्रता कुबल, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा रेवती राणे यांसह राष्ट्रीय, प्रदेश, जिल्हा स्तरावरील महिला पदाधिकाऱ्यांनी व माfहला निरीक्षकांनी गुरूवंदना दिली.
यावेळच्या कार्यक्रमांत महिलांतर्फे शरद पवार या गुरुंकडे, महिलांना लोकसभा व विधान सभा निवडणुकित 33 टक्के आरक्षण मिळण्यासंदर्भात तसेच 18 मुलींच्या लग्नास 18 वर्षे पूर्ण वय कायद्याने केलेले आहे. पण या वयात मुलींची शारीरीक व मानसिक स्थिती परीपक्व नसते. लग्नानंतर 21 वयाच्या अगोदर त्यांना मुलं झाल्यास माता बनलेल्या या मुलींना आरोग्यविषयक, शारीरीक व मानसिक त्रास होतो. त्यामुळे मुलींच्या लग्नाच वय 21 करण्यांत यावे यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी करण्यांत आली. महिलांना राजकारणांत न्याय देणारे आपले गुरू शरद पवार यांनी यासाठी आपण निश्चीत प्रयत्न करू असे आश्वासन दिले.