वृत्तसंस्था/ जम्मू
29 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान श्रीनगरमध्ये वरि÷ांची राष्ट्रीय वुशू चॅम्पियनशीप स्पर्धा भरविण्यात येणार असून या स्पर्धेमध्ये सुमारे 1500 स्पर्धक सहभागी होणार आहेत. दरम्यान, तीन विश्वविजेते आणि चार अर्जुन पुरस्कार विजेते स्पर्धक यामध्ये भाग घेणार आहेत.
जम्मू-काश्मीर वुशू संघटनेला या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी लाभली आहे. 31 वी वरि÷ांची राष्ट्रीय वुशू स्पर्धा मोठय़ा प्रमाणात यशस्वी केली जाईल, अशी ग्वाही या संघटनेचे सचिव कुलदीप हंडू यांनी दिली आहे. सदर स्पर्धेमध्ये तीन विश्वविजेते स्पर्धक, चार अर्जुन पुरस्कार विजेते आणि अन्य काही आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्यांचा समावेश आहे. सदर स्पर्धा सहा दिवस चालणार असून 29 ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचे उद्घाटन जम्मू-काश्मीरचे राज्यपाल लेफ्टनंट मनोज सिन्हा यांच्या हस्ते होणार आहे.