ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांच्या कोठडीत २० मी पर्यंत वाढ करण्यात आली आहे. मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग (Money laundering) प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची यासंदर्भात चौकशी सुरु आहे. ईडीने मलिकांच्या या प्रकरणात ५ हजार पेक्षा अधिक पानांचं आरोपपत्र कोर्टात दाखल केलं आहे. त्यामुळे मालिकांच्या अडचणी वाढणार आहेत.
नवाब मालिकांच्या कोठडी बाबत आज न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने मंत्री मलिक यांच्या कोठडीत २० मे पर्यंत वाढ केली. त्यामुळे मलिक यांच्या अडचणी वाढणार का असा सवाल उपस्थित होत आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या कोठडी संदर्भात मुंबईतील विशेष पी. एम. एल. ए. न्यायालयात आज ही सुनावणी झाली आहे. यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला. तर ईडीने मलिकांच्या या प्रकरणात पेक्षा अधिक पानी आरोपपत्र कोर्टात दाखल केलं आहे.
मनी लॉंड्रिग प्रकरणात मलिक यांना ईडीनं अटक केली आहे. ते सध्या ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. मंत्री नवाब मलिक यांना यापूर्वी दिलेली त्यांची कोठडी आज संपत असल्यानं न्यायालयात हजर केलं असता त्यांच्या कोठडीत आता पुन्हा वाढ केली आहे.