ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये NEET-PG परीक्षा 4 महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीएमओ ऑफिसच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्विट केले आहे.
देशातील 6,102 सरकारी, खासगी, अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांमधील पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांसाठी NEET-PG परीक्षा आयोजित केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीही ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध व्हावेत म्हणून ही परीक्षा पुन्हा 4 महिने लांबणीवर टाकण्यात आली आहे.