विमानातील ७२ प्रवाशापैकी ५ भारतीय
Nepal plane crash नेपाळमधील देशांतर्गत वाहतूक करणाऱ्या यती एअरलाइन्स कंपनीचे एटीआर-७२ हे प्रवासी विमान पोखरा येथे कोसळल्याने विमानातील किमान 44 लोक ठार झाले आहेत. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज सकाळी 10.33 वाजता विमानाने उड्डाण केल्यावर काठमांडू ते पोखरा या मार्गावर जात असताना विमानतळावर लॅंडींग होण्याअगोदर दहा मिनीटे गंडकी नदीजवळ असलेल्या जंगलात विमान कोसळले.
या विमानात एकूण ७२ प्रवाशी होते त्यापैकी 5 भारतीय, 4 रशियन, 1 आयरिश आणि 2 दक्षिण कोरियाचे नागरिक होते, अशी माहिती नेपाळ विमानतळाच्या अधिकाऱ्याने दिली. यात 3 लहान मुलांचा समावेश आहे.
15 वर्षे जुन्या असलेल्या दर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषांचे बचावकार्य करण्यासाठी आपत्ती विभाग आणि स्थानिक प्रशासन करत आहे. विमान क्रॅश झाल्याने विमानाला जोरात आग लागली. स्थानिकांनी प्रथम ती विझवणाचा प्रयत्न केला. त्यानंतर बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांना विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले.
लष्कर, हवाई दल आणि विमानतळ प्राधिकरण या बचाव कार्यासाठी मदत करत आहेत. नव्याने सुरू झालेल्या विमानतळावर उतरत असताना विमान दरीत कोसळले. बचाव कर्मचार्यांना घाटाच्या तळाशी आणखी मृतदेह सापडण्याची शक्यता आहे अशी माहीती कास्की जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी टेक बहादूर के.सी. यांनी सांगितले.