वृत्तसंस्था / नेपाळ
चीनची ‘जागतिक सुरक्षा व्यवस्था’ (ग्लोबल सिक्युरिटी इनिशिएटिव्ह) ही योजना नाकारली आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड हे सध्या चीनच्या भेटीवर असून त्यांनी चीनच्या या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिल्याचे समजते. मात्र, चीनचा सीमापार जाणारा रेल्वे प्रकल्प संमत केला आहे.
सध्या चीनने नेपाळवर आपले लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. चीन-नेपाळ सीमेवर अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प चीन निर्माण करीत आहे. त्यासंबंधी नेपाळने मान्यता दिली आहे, असे स्पष्ट करण्यात आले. चीन आणि नेपाळ यांनी दहल यांच्या दौऱ्याच्या काळात एक प्रदीर्घ संयुक्त निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये या प्रकल्पांची माहिती देण्यात आली आहे. तथापि, या प्रकल्पांमध्ये चीनचा महत्वाकांक्षी जागतिक सुरक्षा पुढाकार प्रकल्प नाही. त्यामुळे तो नेपाळने नाकारलाअ असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकल्पाच्या सुरक्षेसंबंधी नेपाळला शाश्वती वाटत नाही, हे यावरुन सिद्ध होते असे मत तज्ञांनी नंतर व्यक्त केले.
काय आहे प्रकल्प
चीन आणि त्यांच्याशी जवळचे संबंध असणारे, तसेच चीनवर अवलंबून असणाऱ्या देशांची एक संरक्षण साखळी या प्रकल्पाद्वारे निर्माण