गॅलेक्सी एफ54 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअपसोबत 2000 मध्ये प्रीबुकिंग सुविधा
नवी दिल्ली
कोरियन कंपनी सॅमसंगने आपला नवीन 5 जी स्मार्टफोन गॅलेक्सी एफ54 5 जी प्रणालीमध्ये सादर केला आहे. यामध्ये 120 झेडएच रिप्रेशसोबत 6.7 इंच आकाराचा एफएचडी सुपर अमोलेड प्लस डिस्प्ले मिळणार आहे. यासोबतच स्क्रीनला प्रोटेक्शनसाठी गोरिला ग्लासही राहणार आहे.
सदरच्या स्मार्टफोनची किंमतही 29,999 रुपये असणार असून 999 रुपयांमध्ये हा फोन बुक करता येणार आहे. यामध्ये ग्राहकांना 2000 पर्यंत सवलत मिळणार असल्याची माहिती आहे. कंपनीच्या वेबसाईटवर 12 जूनपासून हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.
फिचर्स :
?फोटोग्राफीसाठी 108 एमपीसह 8 एमपी व 2 एमपी असा कॅमेरा सेटअप मिळणार आहे.
?सेल्फीसह व्हीडीओकॉलिंगसाठी 32 एमपी फ्रंट कॅमेरा मिळणार
? पॉवर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी एफ54 मध्ये 25 डब्लू फास्ट चार्जिंग सुविधा मिळणार
? साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर मिळणार
? फोन मिटओर ब्लू,स्टारडस्ट सिल्वर कलरमध्ये उपलब्ध होणार