ऑनलाईन टिम / नवी दिल्ली
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाची पाच वर्षांची मुदत संपत आली आहे. नवीन राष्ट्रपती निवडीसाठी येत्या काही दिवसात निवडणूका होणार असून निवडणूक आयोग आज गुरूवारी दुपारी ३ वाजता राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. या तारखा जाहीर करण्यासाठी निवडणूक पॅनलद्वारे दुपारी पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.
राम नाथ कोविंद यांची 2017 मध्ये राष्ट्रपती म्हणून निवड झाली होती. विद्यमान राष्ट्रपतींचा कार्यकाळ 25 जुलै 2022 संपत आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या पदवर नविन राष्ट्रपती निवडीसाठी निवडणूका होतील. या निवडणूकांच्या तारखा केंद्रिय निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहे.
राष्ट्रपतींच्या निवडणूकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्यांद्वारे राष्ट्रपतींची निवड केली जाते.