New English School and Arts Commerce Junior College meeting today
साटेली / भेडशी प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कूल व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय भेडशी आणि इंग्लिश मीडियम स्कूल भेडशी यांचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दि. 27 रोजी तर बुधवार 28 रोजी ‘कलातरंग’ हा विविध कला गुणदर्शन कार्यक्रम होणार आहे.
या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान भेडशी गावचे सुपुत्र श्री. शांतादुर्गा हायस्कूल डिचोली गोवाचे माजी मुख्याध्यापक देवानंद महादेव गोलम हे भूषवणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक तथा सुशीला मेमोरियल ट्रस्ट दोडामार्ग चे अध्यक्ष विवेकानंद नाईक हे उपस्थित राहणार आहेत तर खे.मे. इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के तोरसस्कर कनिष्ठ महाविद्यालय बांदा माजी प्राचार्य लक्ष्मण पावसकर, माध्यमिक विद्यालय मांगेलीचे माजी मुख्याध्यापक आनंद नाईक,बांदा संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरस्कर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तरी या सर्व कार्यक्रमासाठी आजी-माजी विद्यार्थी, पालक शिक्षक प्रेमी, हितचिंतक, ग्रामस्थ यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन न्यू इंग्लिश स्कूल व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय भेडशीचे प्राचार्य नंदकुमार नाईक यांनी केले आहे.