धोरणाची अंमलबजावणी आजपासून अंमलात : केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली माहिती
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी 31 मार्च रोजी नवीन विदेशी व्यापारी धोरण-2023 (एफटीपी) जाहीर केले. या धोरणामुळे सरकारला जागतिक व्यापारात घट होत असताना निर्यातीला चालना मिळण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे. नवीन एफटीपीसह 2030 पर्यंत भारतातील वस्तू आणि सेवा निर्यात 2 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची सरकारची अपेक्षा असल्याचेही मंत्री गोयल यांनी स्पष्ट केले आहे. व्यवसायाचे आंतरराष्ट्रीयीकरण रुपयामध्ये करण्यावर भर असणार आहे. नवीन परकीय व्यापार धोरण 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे. गोयल म्हणाले की नवीन धोरण रुपयामध्ये व्यवसायाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यावर भर देईल. त्याच वेळी, परकीय व्यापार महासंचालनालयाचे संतोष सारंगी यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष-2023 मध्ये भारताची एकूण निर्यात 2021-22 मधील 676 अब्ज डॉलरच्या तुलनेत 760 अब्ज डॉलरच्या पुढे जाऊ शकते.
परराष्ट्र मंत्रालय सहकार्य करेल
नवीन धोरण 2028 पर्यंत लागू राहण्याची अपेक्षा आहे. तथापि, नवीन परकीय व्यापार धोरणासाठी कोणतीही अंतिम तारीख नसेल, ते आवश्यकतेनुसार करण्यात येणार आहे. गोयल म्हणाले की, सरकार येत्या काही महिन्यांत निर्यातीला चालना देण्यासाठी या क्षेत्रांना जागतिक स्तरावर नेणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने परदेशी मिशनद्वारे भारतात व्यवसाय, तंत्रज्ञान आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
नवे धोरण व्यवसाय सुलभतेला पोषक
मंत्रालयाने सांगितले की, नवीन विदेशी व्यापार धोरणात माफीपासून प्रोत्साहनापर्यंत पावले उचलली जातील. निर्यातदार, राज्ये, जिल्हे आणि भारतीय मिशन यांच्या सहकार्याने निर्यात प्रोत्साहनावर लक्ष केंद्रित केले जाईल. हे धोरण व्यवसाय करण्याच्या सुलभतेला प्रोत्साहन देईल आणि ई-कॉमर्स आणि निर्यात केंद्रांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे वाणिज्य विभागाने स्पष्ट केले आहे. हे धोरण गतिमान असेल.