महापालिका एससीएसटी नोकर संघटनेतर्फे सत्कार कार्यक्रम : अधिकाऱ्यांची उपस्थिती
प्रतिनिधी / बेळगाव
महापौरपदी शोभा सोमनाचे यांची बिनविरोध निवड झाली, तर उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड झाली. त्यामुळे महापालिका एससीएसटी नोकर संघटनेच्यावतीने महापौर-उपमहापौरांची भेट घेऊन शाल, श्र्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच आगामी कामासाठी शुभेच्छा दिल्या.
मागील चार वर्षांपासून महापालिकेत सभागृह नसल्याने प्रशासकीय राजवट होती. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनादेखील प्रशासकीय राजवटीत काम करावे लागले. मात्र आता सभागृह अस्तित्वात आल्याने काम करणे सोयिस्कर बनले आहे. महापौर-उपमहापौर निवड प्रक्रिया झाल्याने गुरुवारी महापालिकेच्या नोकर संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांची भेट घेऊन त्यांना शाल, श्र्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी महापालिकेचे आरोग्यअधिकारी डॉ. संजय डुमगोळ, साहाय्यक कार्यकारी अभियंत्या मंजुश्र्री एम., महसूल निरीक्षक यल्लेश बचलपुरी, परशुराम मेत्री व इतर कर्मचारी उपस्थित होते.