वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी येथे खेळविण्यात आलेल्या सरावाच्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा तर बांगलादेशने श्रीलंकेचा पराभव केला. या सरावाच्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने तसेच मार्क चॅपमनने अर्धशतके झळकविली. रचिन रविंद्रने 97 धावांची खेळी केली.
न्यूझीलंड आणि पाक यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकने 50 षटकात 5 बाद 345 धावा जमविल्या. मोहम्मद रिझवानने शतक (103) तर कर्णधार बाबर आझमने 80 धावा झळकविल्या. न्यूझीलंडच्या सँटेनरने 31 धावात 2 गडी बाद केले. त्यानंतर न्यूझीलंडने 6.2 षटके बाकी ठेवून 5 बाद 346 धावा जमवित हा सामना 5 गड्यांनी जिंकला.
दुसऱ्या सरावाच्या सामन्यात बांगलादेशने लंकेचा 7 गड्यांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लंकेचा डाव 263 धावात आटोपला. लंकन संघातील सलामीची जोडी दास आणि हसन यांनी 131 धावांची भागिदारी केली. टी हसनने 84 तर दासने 61 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेचा डाव कोलमडला. बांगलादेशच्या मेहदी हसनने 3 बळी मिळविले. त्यानंतर बांगलादेशने 3 बाद 264 धावा जमवित विजय नोंदविला.