ऑनलाईऩ टिम नवी दिल्ली
श्रीलंकेतील ( Srilaka ) भारताचे उच्चायुक्त गोपाल बागले (Gopal Bagle ) यांनी शुक्रवारी श्रीलंकेचे नवे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे ( PM Ranil Wikramsinghe ) यांची या पदावर नियुक्ती झाल्यावर दुसऱ्या दिवशी लगेच त्यांची भेट घेतली. “उच्चायुक्तांनी माननीय पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. श्रीलंकेतील सर्व लोकांच्या कल्याणासाठी लोकशाही पद्धतीने श्रीलंकेची आर्थिक पुनर्प्राप्ती आणि स्थिरतेसाठी भारत-श्रीलंका ( India-srilanka ) सहकार्य यावर चर्चा केली” असे कोलंबोस्थित उच्च आयोगाने आपल्या ट्विटर हँडलवर सांगितले आहे.
श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून सहाव्यांदा पदभार सांभाळणारे रानिल विक्रमसिंगे यांची नियुक्ती गुरूवारी गोंधळलेले राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी केली. गोटाभाया राजपक्षे त्यांचे मोठे भाऊ महिंदा राजपक्षे यांनी 9 मे रोजी पदाचा राजीनामा दिला होता.