|Monday, December 16, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

 या आठवडय़ात सुरुवातीच्या दिवसात महत्त्वाची कामे पूर्ण करा. राजकारणात व सामाजिक क्षेत्रात चातुर्याने पाऊले उचलावी लागणार आहेत. धाडसी निर्णय टाळा. बुधवारी व गुरुवारी जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे संभवतात. घरात काटकसरीने वागल्यास पैशाची चणचण जाणवणार नाही. कलाक्रीडा क्षेत्रात नवीन संधी मिळेल. विद्यार्थीवर्गाने कष्ट घेतले तरच यश पदरी पडेल.


वृषभ

कोर्टकचेरीच्या कामात हलगर्जीपणा करून चालणार नाही. नोकरीत अपमान सहन करावा लागू शकतो. तडकाफडकी निर्णय घेणे अयोग्य ठरेल. काळ वेळ पाहून व विचारवंतांच्या सल्ल्याने निर्णय घ्या. व्यवसायात जुनी देणी वसूल करण्याचा प्रयत्न करा. बुध, शुक्राचा अंशात्मक लाभयोग आर्थिक संकट दूर करेल. नाटय़, चित्रपट क्षेत्रात जिद्दीने कामे पूर्ण करावी लागतील. शुक्रवार व शनिवार प्रकृतीची काळजी घ्या.


मिथुन

ग्रहांची फारशी साथ नसल्याने कामांमध्ये गती येत नाही आहे. आत्मविश्वास कमी होत आहे. पण हा आठवडा आपल्या आयुष्यात काही चांगले क्षण घेऊन येणार आहे. नोकरीत थोडय़ा फार प्रमाणात त्रास कमी होईल. मित्र मदत करतील. प्रेमप्रकरणात मात्र सावधपणे निर्णय घ्या. राजकारणात आपल्या हुशारीचे कौतुक होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. व्यवसायात, भागीदारीत मात्र सावध रहा.


कर्क

 आठवडय़ाच्या सुरुवातीला शारीरिक मानसिक त्रास होईल. महिलांनी घरातील कामे करताना काळजी घ्यावी. अपघात संभवतो. नोकरीत देखील वरि÷ांचे बोलणे सहन करावे लागेल. शेतकरीवर्गाला पिकांच्या संबंधित व्यवहारात फायदा होईल. राजकारणात व समाजकारणात शब्द जपून वापरा. खोटे आरोप आपल्यावर होऊ शकतात. बुधवारपासून आपला प्रगतिरथ वेगाने धावू लागेल. आर्थिक लाभ संभवतो.


सिंह

कोणाशी कधी व काय बोलायचे याचे तारतम्य ठेवल्यास राजकारणात मोठी झेप घेता येईल. वर्षाची सुरुवात काही आनंदाचे क्षण घेऊन येणार आहे.  प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. नाटय़ चित्रपट क्षेत्रात मानसन्मानाचा योग जुळून येईल. विद्यार्थ्यांनी मन स्थिर ठेवल्यास कठीण काही नाही. शेअर्समध्ये लाभ संभवतो. बुध शुक्राचा अंशात्मक लाभयोग व्यवहारात स्थिरता आणेल. मात्र धंद्यात नवा भागीदार घेताना चौकशी करा.


कन्या

या आठवडय़ात रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वाद गैरसमज याला सामोरे जावे लागेल. नोकरीत, धंद्यात लोकांचा त्रास सहन करावा लागेल. सोमवारी व मंगळवारी प्रकृतीची काळजी घ्या.  खाण्यापिण्यात हलगर्जीपणा करून चालणार नाही. राजकारणात घाईत निर्णय घेऊ नका. शेतीच्या कामात दुसऱयांवर विसंबून राहून चालणार नाही. आपल्या मौल्यवान वस्तुंची काळजी घ्या. प्रेमप्रकरणात यश मिळेल.


तूळ

तुला राशीची साडेसाती थोडय़ाच दिवसात संपणार आहे. ताण तणावाचा परिणाम शरिरावर होतो. परंतु या आठवडय़ात मनावरील दडपण कमी होईल. सूर्य, चंद्र लाभयोगामुळे राजकारणातील कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करू शकाल. वरि÷ांचा पाठिंबा मिळेल. बुध, शुक्र लाभयोगामुळे धंद्यातील समस्या कमी होतील. कोणताही प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवा. विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी.


वृश्चिक

जीवनाला कलाटणी मिळेल. प्रयत्नाने व ग्रहांच्या साथीने माणसाने आपल्या क्षेत्रात प्रगती करण्याचे ठरविल्यास यश नक्की मिळते. चंद्र गुरु त्रिकोण योग व चंद्र बुध लाभयोग तुम्हाला नवा मार्ग दाखवेल. शिक्षण, नोकरी व धंद्यात चांगली संधी मिळेल. नावलौकिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रात वाढेल. अविवाहितांना लग्नासाठी प्रयत्न करता येतील.


धनु

साडेसाती चालू असली तरी तुमच्या जीवनातील अडचणी कमी होतील. तुम्हाला कला-क्रीडा- साहित्यात प्रसिद्धी व पैसा मिळेल. जीवनसाथी व मुले यांच्या उन्नतीचा मार्ग मिळेल. धंद्यात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक कार्यात नवे धोरण राबवता येईल. शैक्षणिक क्षेत्रात प्रयत्नाला यश येईल. मंगळ नेपच्यून युती तुमचा आत्मविश्वास कायम ठेवेल.


मकर

चंद्र, गुरु त्रिकोण योग व चंद्र, शुक्र युती होत आहे. उत्साहावर योग्य ते नियंत्रण ठेवा. हतबल होऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व राहिल. परंतु गर्वि÷पणाची भाषा नको. धंद्यात फार मोठे धाडस नको. कोर्टकेसमध्ये सावध रहा. शैक्षणिक क्षेत्रात नम्रतेने वागा. खरेदी विक्रीत अंदाज जपून घ्या.


कुंभ

बुध, शुक्र लाभयोग व सूर्य प्लुटो युती तुमचे धाडस वाढवणार आहे. रविवारी तणाव होईल. त्यानंतर मात्र तुमचे वर्चस्व व प्रति÷ा वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचा मुद्दा प्रभावी ठरेल. धंद्यात संधी मिळेल. जमिनीचा व्यवहार जुळून येईल. कौटुंबिक वाटाघाटीत यश मिळेल. विद्यार्थ्यांनी आळस करू नये.


मीन

आठवडय़ाच्या सुरुवातीला घरात व समाजात वाद होऊ शकतो. संयम ठेवा. चंद्र, गुरु त्रिकोण योग व चंद्र मंगळ युती होत आहे. धंदा वाढेल व खर्च वाढतील. शुभ समाचार मिळेल. राजकीय- सामाजिक कार्यात प्रति÷ा व पद मिळण्याचा योग येईल. गुप्त कारवायांना कमी समजू नका. अभ्यासात पुढे जाल.

Related posts: