|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » टोपेंना दुर्मिळ नोटा, नाणी संग्रहाचा छंद

टोपेंना दुर्मिळ नोटा, नाणी संग्रहाचा छंद 

वार्ताहर/ मांगूर

माणूस जस जसा मोठा होत जातो तो त्यानुसार काही तरी छंद जोपासतो. तो छंद जोपासताना जीवाचे रान करतो. असाच एक छंद जोपासणारी व्यक्ती म्हणजे मांगूर येथील अशोक आनंदा टोपे. त्यांनी भारत, नेपाळ, अमेरिका, भूतान, युक्रेन, सौदी अरेबिया आदी देशांच्या दुर्मिळ नोटा व नाणी संग्रहीत केले आहेत. त्या छंदातून त्यांनी युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

अशोक टोपे यांचे शिक्षण 12 वीपर्यंत झाले आहे. सामाजिक काम करताना त्यांना दुर्मिळ नाणी व नोटा संग्रह करण्याचा छंद लागला. तो जोपासताना त्यांनी वेळ व पैशाचा विचार केला नाही. मित्र, पाहूणे, बँका यांना भेटी देऊन त्यांच्याकडील जुन्या नोटा व नाणी गोळा केली. त्याचा संग्रह दिवसेंदिवस वाढत गेला आज त्यांच्याकडे अनेक देशांच्या नोटा, नाणी आहेत. हा छंद गेली 10 वर्षे ते जोपासत आहेत.

गावातील बाजारात त्यांना पाच रुपयाचे पिवळे नाणे गोळा करण्याचा छंद लागला. तेव्हापासून आजतागायत त्यांनी दोन हजार नाणी गोळा केली आहेत. या  छंदाविषयी टोपे म्हणाले, सध्याची मुले टीव्ही, मोबाईलमुळे परंपरेने चालत आलेली संस्कृती, इतिहास विसरत आहेत. तर इतिहास कालीन चलनांची माहिती नाही. ती त्यांना व्हावी. तसेच त्याकाळी चलन कसे होते. याची सखोल माहिती व्हावी हाच मूळ उद्देश आहे. त्याचबरोबर जगविख्यात नाणी संग्रहकार चौगुले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. तसेच अमेय गोखले-कोल्हापूर यांच्यासह जयसिंगपूर, निपाणीसह अनेक ठिकाणच्या नाणी संग्रहांना भेटी देऊन हा छंद जोपासण्यास प्रेरणा घेतली असल्याचे सांगितले.

अन्य क्षेत्रात योगदान

या जोपासलेल्या नाणी व नोटा संग्रहाबद्दल मांगूर येथील विद्यार्थी संघटनेकडून सन 2014-15 या साली टोपेना छंद माझा वेगळा हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. टोपे यांना जुन्या नोटा, नाणी संग्रहाबरोबर अभिनयाची आवड सुद्धा आहे. 1979 ला लक्ष्मी या मराठी चित्रपटामध्ये बालकलाकाराची भूमिकाही त्यांनी साकारली आहे.

नाटकातून समाजप्रबोधन

1982 साली महाराष्ट्र राज्याचे कुमार गटाचे कबड्डी कॅप्टन म्हणून त्यांनी कामगिरी बजावली आहे. सुशांत कस्टम हाऊस कोल्हापूर येथे नोकरी करत असताना गाण सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशी बोलण्याचा त्यांना योग आला आहे. गणेश चतुर्थीवेळी विविध सजीव देखाव्यामध्ये अनेक प्रकारच्या भूमिका साकारून समाज प्रबोधनाचे कार्य करत असतात.