|Friday, December 6, 2019
You are here: Home » मनोरंजन » परग्रहावरील प्रवासाची कहाणी पॅसेंजर्स

परग्रहावरील प्रवासाची कहाणी पॅसेंजर्स 

ऍव्हलॉन या स्टारशीपवरील जवळपास 5 हजार प्रवाशांना होमस्टेड 2 या ग्रहावर नेले जात असते. या संपूर्ण प्रवासाला जवळपास 120 वर्षांचा कलावधी अपेक्षित आहे. या सर्व प्रवाशांना बेशुद्धावस्थेत ठेवण्यात येते. मात्र, यातील एक प्रवासी जीम प्रेस्टन 90 वर्ष आधीच जागा होतो. या स्टारशीपवर एकटेपणा जाणवत असताना जीमची नजर बेशुद्धावस्थेत असलेल्या ऑरोरावर जाते. तो तिला शुद्धीत आणतो. तिला पाहताक्षणीच तो तिच्या प्रेमात पडतो. त्यांचा हा प्रवास सुखकर नसतो. त्यांना येणाऱया अडचणी या चित्रपटात आहेत. क्रिस प्रॅट, जेनिफर लॉरेन्स, ऍण्डी ग्रशिया, मायकेल शीन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मॉर्टन टिलडम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Related posts: