|Thursday, November 14, 2019
You are here: Home » Top News » उत्तरप्रदेशातील यादवी आता निवडणूक आयोगात

उत्तरप्रदेशातील यादवी आता निवडणूक आयोगात 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या समाजवादी पक्षातला वाद थांबता थांबेना कारण सत्तेसाठी नाती- गोती वेशीला टांगणऱया यादव कुटुंबांच्या यादवीने आता समाजवादी पक्षाचा चिन्ह असलेल्या सायकलसाठी निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळवल्यानंतर अखिलेश यादव यांचे समाजवादी पक्षावर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित झाले आहे. पण वडील मुलायम सिंह हे पक्षाचे चिन्ह आपल्याकडे रहावे यासाठी निवडणूक आयोगात पाहोचले आहेत. मुलायम सिंह आणि त्यांचे निकटवर्ती शिवपाल हे दोघेही आज दिल्लीत निवडणूक आयोगाकडे या चिन्हाच्या मागणीसाठी जाणार आहेत.
समाजवादी पक्षातल्या 200 हुन अधिक आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने अखिलेश स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची भीती वडिलांना आहे आणि त्यामुळेच हा सगळा खटाटोप सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related posts: