|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » भविष्य » नियोजन, आयोजन व प्रयोजन बुध. दि. 4 ते 10 जानेवारी 2017

नियोजन, आयोजन व प्रयोजन बुध. दि. 4 ते 10 जानेवारी 2017 

    नोटाबंदीमुळे बरेच व्यवहार थंडावले असून मंदीची लाट आहे. राजहट्ट, बालहट्ट व स्त्रीहट्ट यांना कोणीही अडवू शकत नाही, असे म्हणतात. नोटाबंदी हा राजहट्टाचा परिणाम असून तो राष्ट्रविकासासाठी आवश्यक आहे. त्याला कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही. आर्थिक अडचणी, ताणतणाव, आर्थिक वादविवाद, व्यवहारांची फरफट व कोलमड हे सारे मान्य केले तरी आपल्या हातून लक्ष्मीचा अपमान होणार नाही याची काळजी प्रत्येकानेच घ्यायला हवी. लक्ष्मीचे पावित्र्य जपले तर  तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता, यातायात पडणार नाही. कितीही संकटे आली तरीही बचाव होईल. संडास, बाथरुम अथवा गादीत वा अडगळीत पैसा साठवून ठेवण्याचे कृत्य काहीजण करतात. हे योग्य  आहे का? वा त्या पैशाच्या गुर्मीत वावरताना दिसतात. पैशाच्या जोरावर धमक्मया देणे, जीवावर उठणे, हुंडय़ासाठी स्त्रियांची छळवणूक करणे वा रम, रमा, रमी या गोष्टींवर पैसा उधळणे यासारख्या प्रकारामुळे लक्ष्मीचा कोप होणार नाही का? परंतु जिथे जिथे लक्ष्मीचे सान्निध्य आहे त्याचे पावित्र्य पाळून पूजन केल्यास लक्ष्मीची अखंड कृपा राहू शकते. स्त्रियांचा मान, मुक्मया प्राण्याच्ंाs रक्षण, मातापित्यांचा आदर, मालकाविषयी कृतज्ञता, तसेच राहत्या वास्तुत पावित्र्य वा शांती समाधान ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. पण आजकाल टीव्हीचा प्रचंड गोंगाट, रडव्या सिरिअल्स तसेच वास्तुशास्त्राच्या नावाखाली चांगल्या घराची मोडतोड वा पाडापाडी, स्वत:च्या वास्तुविषयी प्रेम नसणे, वास्तुदेवतेचा अपमान यामुळेही लक्ष्मी कोपते. एखाद्याने सांगितले म्हणून लोक वास्तुशांती केलेल्या घराची पाडापाडी करतात. परंतु त्याचे भयानक परिणाम दिसून आलेले आहेत. वास्तु पुरुषांचे स्थान चुकले म्हणून खोदून जेथे आवश्यक तेथे प्रति÷ापित करतात. वास्तुपुरुष हलविल्यानंतर जीवावरची संकटे येतात हे अनेकांना कळत नसते व लक्ष्मीही कोपते त्यासाठी कोणतेही काम करण्यापूर्वी योग्य नियोजन केल्यासच साफल्य मिळू शकते. वास्तुशास्त्राच्या विरुद्ध असलेल्या घरातही सुखसमृद्धी समाधान दिसून येते तर पाडापाडी करून बांधून घेतलेल्या घरात अडचणींचे डोंगर दिसून आलेले आहेत. यासाठीच वर्तन स्वच्छ ठेवा. कोणाचेही कधीही, कोठेही, कोणत्याही मार्गाने अनिष्ट चिंतन करू नका. विचार चांगले असतील तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो व भाग्य उजळते. लक्ष्मीची कृपा लाभते. कुंडलीतील धनसहय बिंदूवरून लक्ष्मीचा कोप आहे किंवा नाही हे स्पष्टपणे समजू शकते. त्यासाठीच आपली जन्मपत्रिका अत्यंत सूक्ष्म असणे गरजेचे आहे. नियोजन, आयोजन व प्रयोजन याचा योग्य ताळमेळ साधल्यास सर्व क्षेत्रात आपली सर्वांगीण प्रगती होऊ शकते.

(अंतिम भाग)


मेष

 अनेक महत्त्वाचे संकल्प यावषी सिद्ध होतील. या महिन्यात शुक्र, मंगळ, केतू, युती लाभात हा एक अत्यंत विचित्र योग आहे. अनेकांच्या ओळखी होऊन मित्रपरिवार वाढेल. या योगावर प्रेमविवाहाच्या संधीदेखील येतात. नोकरी व्यवसायात अचानक कलाटणी मिळेल. इतरांच्या चुकीचा परिणाम भोगावा लागतो, सावध रहा.


वृषभ

दशमस्थानी शुक्र, मंगळ, केतू, नेप, युती विचित्र फळे देईल. इतरांची कारस्थाने तुमच्या पथ्यावर पडतील. किंमती वस्तूंची खरेदी कराल. कारखाना किंवा एखादी मोठी संस्था उभी करण्याचा विचार कराल. परंतु सावधानता आवश्यक कारण नेपमुळे फसवणूकदेखील होऊ शकते.


मिथुन

भाग्यस्थानी शुक्र, मंगळासह चतुग्रह युती गैरसमज निर्माण करणारी आहे. एखाद्या व्यक्तीला सहज लिफ्ट द्याल, पण लोक काहीतरी वेगळीच समजूत करून घेतील. आर्थिक बाबतीत मात्र हा चांगला कालावधी आहे. फॅशनेबल व किंमती वस्तू खरेदी कराल.


कर्क

अष्टमस्थानात नेप, केतू, शुक्र, मंगळ युती हा कुयोग आहे कोणाही क्यक्तीबरोबर जितक्मयास तितकेच वागा. नैतिकतेला ग्रहण लागणार नाही याची काळजी घ्यावी. कोल्ड्रिंक वा तत्सम पदार्थातून अमली/मादक पदार्थ देण्याचा वा तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार होण्याची शक्मयता. स्त्रियांनी काळजी घ्या.


सिंह

सप्तमातील चतुग्रह युती वैवाहिक जीवनात खळबळ माजविण्याची शक्मयता असते. त्यासाठी आपल्यावर बदनामीचा कोणताही डाग पडणार नाही याची काळजी घ्या. भागीदारी व्यवसायात गफलत होणार नाही याची दक्षता घ्या, काही चांगले प्रसंगही घडतील.


कन्या

ष÷स्थानी चतुग्रह युती आरोग्यावर परिणाम करतील. व्यसनाधीनतेपासून दूर रहा. प्रेमप्रकरणात गुंतण्याची शक्मयता परंतु आर्थिक बाबतीत हा योग अतिशय चांगला, नोकरीत अधिकार मिळेल. शेती, बागायती, प्रसूतीगृहे यांच्याशी संबंधित क्षेत्रात फायदा.


तुळ

अध्यात्म, व्यसन, चैनी, प्रेमप्रकरणे, कलाकुसरीत यश अशी सरमिसळ भेसळ होऊन चतुग्रह युती आलेली आहे. पूर्वपुण्याई शिल्लक असल्यास कुटुंबाचा उद्धारदेखील होऊ शकतो. तरुण तरुणींनी काही बाबतीत सावध राहणे अति आवश्यक आहे.


वृश्चिक

सुखस्थानातील चतुग्रह युती घरगुती सुधारणा व टापटीप करण्याची प्रवृत्ती वाढविल. नात्यातील व्यक्तींशीच विवाहसंबंध जुळण्याची शक्मयता, खर्चावर नियंत्रण ठेवा. तसेच व्यसनांचा शिरकाव होणार नाही याची काळजी घ्या.


धनु

तृतियेत चतुग्रह युती अनेकबाबतीत नाटय़मय घटना घडवेल. धाडसी निर्णय घ्याल. कलाकौशल्यात प्राविण्य व दूरवरचे प्रवास घडतील. तरुण मुलामुलींनी प्रेमप्रकरणे व व्यसनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. खर्च आटोक्मयात ठेवा.


मकर

धनस्थानी शुक्र, मंगळासह चतुग्रह युती चैनी प्रवृत्ती वाढवेल. नको त्या वस्तुंसाठी खर्च कराल. आर्थिक बाबींवरून गैरसमज वाढण्याची शक्मयता, नियोजन/आयोजन योग्य ठेवा म्हणजे कोणतेही काम यशस्वी करू शकाल.


पुंभ

तुमच्या राशीतच महत्त्वाच्या अनेक ग्रहांची युती आहे. त्यामुळे निर्णय घेताना तारांबळ उडेल. एखादी गुप्त कला उपजीविकेचे साधन बनू शकेल. आकर्षकपणा, देखणेपणा व फॅशन यांच्या जोरावर इतरांवर छाप पाडाल. त्याचा तुमच्या आर्थिक व्यवहारावर चांगला परिणाम दिसेल.


मीन

व्ययस्थानी शुक्र, मंगळ, केतू, नेप. हा ग्रहयोग चांगला नसतो. चारित्र्यावर परिणाम करणारा हा योग आहे. तरुणाईने तर विशेष काळजी घ्यावी. मादक, अंमली पदार्थाचे व्यसन, फालतु खर्च. वा मित्रमैत्रिणींच्या मागे लागून चैनीवृत्ती वाढण्याची शक्मयता. आध्यात्मिक क्षेत्रातील बुवाबाजीपासून दूर रहा.

Related posts: