|Monday, February 24, 2020
You are here: Home » leadingnews » अनुराग ठाकूर, अजय शिर्के ‘आऊट’ : न्यायालयाचा बीसीसीआयला दणका

अनुराग ठाकूर, अजय शिर्के ‘आऊट’ : न्यायालयाचा बीसीसीआयला दणका 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

लोढा समितीच्या शिफारसी लागू न केल्याच्या पार्श्वभूमीवर लोढा न्यायालयाने बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर व सचिव अजय शिर्के यांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे हे दोघेही बीसीसीआयमधून आऊट झाले असून, क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.

न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने या दोघांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर न्यायालयासमोर खोटी साक्ष दिल्याप्रकरणी कारवाई का करू नये, असा अशी कारणे दाखवा नोटीसही संबंधितांना देण्यात आली आहे. मागील वर्षी 18 जुलैला कोर्टाच्या निर्णयानुसार बीसीसीआयचे पदाधिकारी नियमानुसार अपात्र ठरले होते. लोढा समितीने बीसीसीआयच्या पदाधिकाऱयांना हटविण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. लोढा समितीच्या भूमिकेनंतर न्यायालयानेही बीसीसीआयला शिफारशी लागू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, वारंवार सूचना केल्यानंतरही बीसीसीआयने त्याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने अखेर ठाकूर व शिर्के यांची हकालपट्टी करीत न्यायालयाने त्यांना दणका दिला आहे. बीसीसीआयच्या नव्या पदाधिकाऱयांची नावे सुचविण्यासाठी न्यायालयाने फली नरीमन व गोपाल सुब्रमण्यम यांची नेमणूक केली आहे.

Related posts: