|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » जम्मू-काश्मीर विधानसभेत राष्ट्रगीताचा अवमान

जम्मू-काश्मीर विधानसभेत राष्ट्रगीताचा अवमान 

राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान गोंधळ :

श्रीनगर/ वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी भाजप-पीडीपी आघाडी सरकारविरोधात सभागृहात मोर्चा उघडला. विरोधी पक्षांनी या गोंधळादरम्यान राष्ट्रगीताच्या सन्मानाची देखील जाणीव ठेवली नाही. अधिवेशन सुरू होताच विरोधी पक्षाचे आमदार गोंधळ घालू लागले आणि त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रगीत सुरू असताना देखील विरोधकांचा गोंधळ थांबला नाही. भाजपने विरोधकांवर राष्ट्रगीताच्या अवमानाचा आरोप केला.

सभागृहात राष्ट्रगीत सुरू असताना देखील विरोधकांनी आपला गोंधळ सुरूच ठेवल्याचा दावा भाजपने केला. भाजप आमदार रवींद्र रैना यांनी विरोधकांसह राज्यपालांवर देखील राष्ट्रगीताच्या अवमानाचा आरोप केला आणि त्यांच्याकडे माफीची मागणी केली. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने सभागृहात राष्ट्रगीत सुरू असतानाच गोंधळ घातला, राज्यपाल देखील राष्ट्रगीतावेळीच सभागृहाच्या बाहेर पडले असा दावा त्यांनी केला. विरोधकांचा वाढता गोंधळ पाहता राज्यपालांना आपले भाषण अर्धवट सोडावे लागल्याचे प्रसारमाध्यमांकडून सांगण्यात आले.

 

Related posts: