|Sunday, November 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » अग्नी-4 ची चाचणी यशस्वी

अग्नी-4 ची चाचणी यशस्वी 

4000 किलोमीटरपर्यंत अण्वस्त्रs वाहून नेण्यास सक्षम

बालासोर / वृत्तसंस्था

डीआरडीओने सोमवारी बालासोर येथे अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 4 हजार किलोमीटर असून याची आधीची क्षमता 3500 किलोमीटर एवढी होती. अग्नी-4 देखील अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. 27 डिसेंबर रोजी अब्दुल कलाम बेटावरून 5 हजार किलोमीटर मारकक्षमतेच्या अग्नी-5 ची चाचणी यशस्वी ठरली होती. भारत आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र बनविणारा पाचवा देश आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीन यांनी याआधीच अशाप्रकारचे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.

अग्नी-4 मध्ये अचूक लक्ष्य भेदण्यासाठी रिंग गायरो आधारित इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टीम (आरआयएनएस), मायक्रो नेव्हिगेशन सिस्टीम (एमएनएस) लावलेले आहेत. हे क्षेपणास्त्र 1000 टनापर्यंत शस्त्रास्त्रs वाहून नेऊ शकते. घन इंधनापासून कार्यान्वित अग्नी-4 मध्ये दोन इंजिनांचा अंतर्भाव आहे. याची लांबी 20 मीटर आणि लाँच वेट 17 टन एवढे आहे. तसेच याला मोबाइल लाँचरने डागले जाऊ शकते.

अग्नी-5

-अग्नी-5 पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणाऱया माध्यमापासून आंतरखंडीय क्षमतेचे क्षेपणास्त्र आहे. 27 डिसेंबर रोजी या क्षेपणास्त्राची चौथी चाचणी होती. दुसऱया आणि तिसऱया चाचणीद्वारे हे क्षेपणास्त्र 20 मिनिटात लक्ष्य भेदू शकत असल्याचे सिद्ध झाले होते.

-19 एप्रिल 2012 रोजी अग्नीची पहिली, 15 सप्टेंबर 2013 रोजी दुसरी आणि 31 जानेवारी 2015 रोजी तिसरी चाचणी झाली होती. अग्नी-5 ची दिशादर्शक आणि मार्गदर्शक व्यवस्था त्याला विशेष बनविते असे वैज्ञानिकांचे मानणे आहे.

-क्षेपणास्त्रामध्ये रिंग लेजर गायरो आधारित इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टीम आणि मायक्रो नेव्हिगेशन सिस्टीम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे अचूक लक्ष्य भेदण्यास मदत होते. एमआयआरव्ही तंत्रज्ञानामुळे अनेक लक्ष्यांवर एकाचवेळी वार करणे शक्य.

भारत-पाक तुलना

-दोन्ही देशांच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात प्रचंड मोठे अंतर आहे. भारत 5000 किलोमीटरपर्यंत वार करणारे आण्विक क्षेपणास्त्र अग्नी-5 विकसित करू शकला. तसेच 10 हजार किलोमीटरपर्यंत जाणारे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित करत आहे.

-पाकिस्तान आतापर्यंत शाहीन-3 पर्यंतच पोहोचला आहे. याची क्षमता 2750 किलोमीटर एवढीच आहे. पाक तैमूर आंतरखंडीय क्षेपणास्त्रावर काम करत आहे, ज्याची क्षमता अग्नी-5 एवढी असेल. म्हणजेच पाक आमच्यापेक्षा 1 पाऊल मागे आहे.

अग्नीची वाढतेय मारकक्षमता

अग्नी 1 : 700 किलोमीटर

अग्नी 2 : 2000 किलोमीटर

अग्नी 3 : 2500-3000 किलोमीटर

अग्नी 4 : 4000 किलोमीटर

अग्नी 5 : 5000 किलोमीटर

Related posts: