|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » इस्तंबूल हल्ल्यामागे इस्लामिक स्टेट

इस्तंबूल हल्ल्यामागे इस्लामिक स्टेट 

मृतांमध्ये बॉलिवूड निर्माते अबीस रिझवी, गुजरातच्या खुशी शाहचा समावेश

इस्तंबूल/ वृत्तसंस्था

तुर्कस्तानच्या इस्तंबूल शहरातील रियान नाईटक्लबमध्ये झालेल्या हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा हात होता. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे. या हल्ल्यात 2 भारतीय नागरिक देखील मारले गेले होते. ‘रोर’ चित्रपटाचे निर्माते अबीस रिझवी आणि गुजरातच्या खुशी शाह हिचा देखील या हल्ल्यात मृत्यू झाला.  अबीस हे माजी राज्यसभा खासदार अख्तर रिझवी यांचे पुत्र आहेत.

अबीस आणि खुशी हे हल्ल्यात ठार झाल्याचे कळल्यानंतर त्यांचे कुटुंबीय इस्तंबूलसाठी रवाना झाले. अबीस यांचे वडिल अख्तर रिझवी आणि आई तुर्कस्तानसाठी रविवारी संध्याकाळी उशिरा रवाना झाल्या. विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांच्या व्हिसाची व्यवस्था करून दिली.

तर खुशी हिचा भाऊ आणि चुलत बहिण इस्तंबूलसाठी रवाना झाल्याचे सुषमांनी ट्विटरवर सांगितले. भारतीय कुटुंबांशी इस्तंबूल विमानतळावर संपर्क साधत त्यांच्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्था करण्याचा आदेश स्वराज यांनी तुर्कस्तानमधील भारताचे राजदूत राहुल कुलश्रेष्ठ यांना दिला आहे.

इस्तंबुल हल्ल्यात ठार झालेले अबीस हे माजी खासदार अख्तर हसन रिझवी यांचे मुलगे आणि रिझवी बिल्डर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील होते. अबीस हे बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शक आणि निर्माते देखील होते. तसेच सेलिब्रिटी वर्तुळात ते लोकप्रिय होते. त्यांनी ‘रोरः टायगर ऑफ सुंदरबन’ नावाचा चित्रपट तयार केला होता. अबीस हे मित्रांसमवेत नववर्ष साजरा करण्यासाठी तुर्कस्तानला गेले होते.

Related posts: