|Thursday, August 22, 2019
You are here: Home » क्रिडा » टॉटनहॅम हॉटस्पर विजयी

टॉटनहॅम हॉटस्पर विजयी 

वृत्तसंस्था/ वेटफोर्ड

प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात टॉटनहॅम हॉटस्परने वेटफोर्डचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या विजयामुळे टॉटनहॅमने स्पर्धेच्या गुणतक्त्यात पहिल्या आघाडीच्या चार संघांमध्ये स्थान मिळविले.

या सामन्यात टॉटनहॅमच्या हॅरी केनने 27 व्या आणि 33 व्या मिनिटाला असे दोन गोल नेंदविले. केनचा या स्पर्धेतील हा शंभरावा सामना होता. टॉटनहॅमच्या डिले ऍलीने उत्तरार्धात दोन गोल गेले. या विजयामुळे टॉटनहॅम गुणतक्त्यात 39 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. वेटफोर्डतर्फे एकमेव गोल केबॉलने नोंदविला.