|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » जम्मू- काशमीरमध्ये चकमक ; एक दहशतवादी ठार

जम्मू- काशमीरमध्ये चकमक ; एक दहशतवादी ठार 

ऑनलाइन टीम / जम्मू- काशमीर :

जम्मू- काशमीरच्या बारामुल्ला जिल्हात आज पहाटेपासून भारतीय सैन्याची दहशतवाद्यांशी चकमक सुरू असून यात एक दहशतवादी ठार झाला आहे.

संरक्षण दलाने शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. बारामुल्ल जिल्हातल्या हरितार तरझू भागात दोन दहशतवादी लपल्याचा संशय सैन्याला होता, या पैकी एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहिती नुसार, 2016 या वर्षात जम्मू-काशमीरमध्ये 2 डिसेंबर पर्यंत 16 चकमकी झाल्या होत्या.