|Sunday, December 15, 2019
You are here: Home » मनोरंजन » आमीर कधीही दिसला नाही कपिलच्या शोमध्ये

आमीर कधीही दिसला नाही कपिलच्या शोमध्ये 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये आत्तापर्यंत सलमान खानपासून ते महानायक बिग बी अमिताभ बच्चनपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मात्र, कपिलच्या शोमध्ये बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट असलेल्या आमिर खानने अद्यापही हजेरी लावली नाही.

aamir-khan

कपिलचा शो ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ आणि आत्ताचा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान, किंग खान शाहरुख खान, बिग बी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, ऐश्वर्या राय-बच्चन, काजोल, अनुष्का शर्मा, यांच्यासारख्या दिग्गजांनी हजेरी लावली. प्रत्येकाने आपापले सिनेमे प्रमोट करण्याच्या निमित्ताने कपिलच्या शोमध्ये सहभाग घेतला. मात्र, आमिर खानने अजून एकदाही प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये आला नाही.

Related posts: