|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मुणगे भगवती देवस्थानचा 11 पासून वार्षिकोत्सव

मुणगे भगवती देवस्थानचा 11 पासून वार्षिकोत्सव 

मुणगेयेथील श्री देवी भगवतीचा वार्षिक जत्रोत्सव 11 ते 15 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत सकाळी 11 वा. विविध धार्मिक विधी, सायंकाळी 5 वा. गोंधळी वादन, 7 वा. नौबत, रात्री 8 वा. संगीत भजने, रात्री 12 वा. पुराणवाचन, 12.30 वा. पालखी, 1.30 वा. गोंधळ, कीर्तन, तर पाचव्या दिवशी लळिताचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी भगवती देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी केले आहे.