|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » अखिलेशच मुख्यमंत्री पदासाठी पहिली पसंत

अखिलेशच मुख्यमंत्री पदासाठी पहिली पसंत 

उत्तरप्रदेश जनमत चाचणी : 28 टक्के लोकांचा अखिलेश यांच्याकडे कल

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक-2017 साठी सीएसडीएस आणि एबीपी न्यूजने जनमत चाचणीचा निष्कर्ष जाहीर केला आहे. नोटाबंदी आणि समाजवादी पक्षातील भांडणादरम्यान 5 ते 17 डिसेंबर या काळात 65 विधानसभा मतदारसंघातील 5000 पेक्षा अधिक जणांचे मत विचारात घेण्यात आले. यानुसार उत्तरप्रदेशच्या 28 टक्के लोकांनी अखिलेश यादवच पुढील मुख्यमंत्री म्हणून योग्य वाटत असल्याचे म्हटले. 34 टक्के लोक अखिलेश आणि 32 टक्के जण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाने समाधानी असल्याचे जनमत चाचणीच्या निष्कर्षात सांगण्यात आले.

 हे सर्वेक्षण समाजवादी पक्षातील अंतर्गत कलहाने उग्र रूप धारण करण्याच्या आधी करण्यात आले आहे. त्यामुळे मुलायम आणि अखिलेश यांच्यातील टोकाच्या वादानंतर चित्रात निश्चितच फरक पडू शकतो. सपमधील वादाचा थेट लाभ भाजपला होईल. त्याचबरोबर मोदींच्या लखनौतील सभेला मिळालेला प्रतिसादही मोठा होता. त्यामुळे जनमत चाचणीच्या निष्कर्षांना निकालाद्वारे धक्का बसू शकतो.

उत्तरप्रदेशचा सर्वाधिक लोकप्रिय नेता

अखिलेश यादव 83 टक्के

मुलायम यादव  6 टक्के

 

मुख्यमंत्री कोण व्हावे ?

अखिलेश          यादव    37 टक्के

मुलायम यादव  33 टक्के

सपच्या मतदारांमध्ये 83 टक्के जणांची पसंती अखिलेश यांनाच आहे.

 

मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती

अखिलेश यादव पहिल्या स्थानी

मायावती                    दुसऱया स्थानी

योगी आदित्यनाथ         तिसऱया स्थानी

 

कोणाचे सरकार अधिक चांगले ?

45 टक्के जणांनी अखिलेश यांचे सरकार मायावती यांच्या सरकारपेक्षा खूप चांगले असल्याचे मानले.

Related posts: