|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » व्यावसायिकांकडून भेटवस्तू स्वीकारण्याप्रकरणी नेतान्याहूंची चौकशी

व्यावसायिकांकडून भेटवस्तू स्वीकारण्याप्रकरणी नेतान्याहूंची चौकशी 

जेरुसलेम

व्यावसायिकांकडून भेटवस्तू स्वीकारल्याच्या आरोपाप्रकरणी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांची पोलिसांनी चौकशी केली आहे. भेटवस्तू स्वीकारणे जनप्रतिनिधीच्या जबाबदारीचे उल्लंघन मानले जाते. प्राथमिक चौकशीत गुन्हेगारी कारवाई सुरू करण्याचे पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर ऍटर्नी जनरल एविचाई मॅनडेलब्लिट यांनी चौकशीला मंजुरी दिली.

नेतान्याहू यांची त्यांच्या निवासस्थानी सोमवारी संध्याकाळी चौकशी करण्यात आली, जी अनेक तास चालली. या प्रकरणी या पुढे देखील चौकशी सुरू राहिल. नेतान्याहू यांच्याद्वारे इस्रायली आणि विदशी व्यावसायिकांकडून कोटय़वधी शेकेलच्या (इस्रायली चलन) भेटवस्तू स्वीकारण्यासंबंधी चौकशी सुरू आहे. त्यांच्याविरोधात दोन प्रकरणांची चौकशी सुरू आहे. मागील काही वर्षांमध्ये नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा अनेक प्रकारच्या वादात सापडल्या आहेत. यात सरकारी पैशाचा दुरुपयोग आणि त्यांच्या परिवाराशी संबंधित खर्चाचे लेखापरीक्षण सामील आहे. परंतु नेतान्याहू यांनी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार केला नसल्याचे म्हटले.

Related posts: