|Thursday, November 14, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » 2010 च्या हिंसाचाराप्रकरणी अब्दुल्लांनी मान्य केले अपयश

2010 च्या हिंसाचाराप्रकरणी अब्दुल्लांनी मान्य केले अपयश 

श्रीनगर

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी 2010 साली काश्मीर खोऱया झालेल्या हिंसाचारासाठी स्वतःला जबाबदार ठरविले आहे. विधानसभेत 2016 च्या हिंसाचारावर महबूबा मुफ्ती यांना लक्ष्य करताना उमर यांनी बंदूक आपल्या खांद्याला लागली नसली तर आपण जबाबदारी पार पाडण्यास अपयशी ठरल्याचे मानतो असे वक्तव्य केले.

2010 च्या स्थितीसाठी मी दगडफेक करणाऱया मुलांच्या आईवडिलांना किंवा पाकिस्तानला दोषी ठरविले नाही. यासाठी कोणालाही बळीचा बकरा देखील बनविला नाही. ज्या पदावर मी होतो, त्याची जबाबदारी होती, जी पार पाडण्यास मी अपयशी ठरलो असे उमर यांनी म्हटले.

उमर मुख्यमंत्री असताना 2010 साली काश्मिरात 3 कथित दहशतवाद्यांच्या चकमकीतील खात्म्याला तत्कालीन विरोधकांनी बनावट कारवाई ठरविले होते. ज्यानंतर खोऱयात हिंसाचाराचा वणवा पेटला होता. 2010 आणि 2016 च्या हिंसाचाराची तुलना केली जाऊ शकत नाही असा दावा उमर यांनी केला.

Related posts: