|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » अमेरिकेत विमानतळांवर अडकले हजारो प्रवासी

अमेरिकेत विमानतळांवर अडकले हजारो प्रवासी 

वॉशिंग्टन

पूर्ण अमेरिकेत कस्टम सर्व्हिस संगणक सेवेत बिघाड झाल्याने हजारो प्रवासी अधिकृत प्रवेशाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत विमानतळांवर रांगेत उभे राहण्यास विवश झाले. अमेरिका आणि कॅरेबियासाठी एक प्रमुख केंद्र फोर्ट लॉडरडेल विमानतळाने ट्विटरवर याची माहिती दिली. देशभरात कस्टम आणि सीमा सुरक्षेचे कामकाज स्थगित झाले आहे. यंत्रणा पुन्हा कार्यान्वित होईपर्यंत प्रवाशांच्या ये-जा प्रकियेला विलंब होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

यंत्रणा बिघाडामुळे 30 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय विमानांचे प्रवासी प्रभावित झाल्याचे मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका अधिकाऱयाने सांगितले. मियामी, अटलांटा हार्ट्सफील्ड, बॉस्टन लोगन आणि फोर्ट लॉडरडेल या विमानतळांवर प्रामुख्याने ही समस्या निर्माण झाल्याचे प्रशासनाने म्हटले. कस्टम्स आणि सीमा सुरक्षा विभागाच्या प्रवक्त्याने तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे सांगितले.

Related posts: