|Sunday, November 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » ऑस्टेलियन राजदूताकडून नोटाबंदीचे कौतुक

ऑस्टेलियन राजदूताकडून नोटाबंदीचे कौतुक 

नवी दिल्ली/वृत्तसंस्था

भारतातील ऑस्ट्रेलियाच्या राजदूत हरिंदर सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे जोरदार कौतुक केले आहे. भारतात नोटाबंदीच्या निर्णयानंतर ऑस्ट्रेलियात देखील सर्वाधिक मूल्याची नोट बदं करण्यावर विचार सुरू आहे. मोदींच्या या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियात काळ्या पैशाच्या समस्येचा सामना करण्याची पेरणा मिळाली आहे. तेथे देखील आता काळा पैशाविरोधात कृतिदलाची स्थापना झाल्याचे सिद्धू यांनी सांगितले.

नोटाबंदी निर्णयाचा माझ्यावर चांगला प्रभाव पडला आहे. जर हा निर्णय यशस्वी ठरला तर भारतीय व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणेल. माझ्या दृष्टीकोनातून हा प्रभावी सुधार आहे. सरकारने याची अंमलबजावणी ज्याप्रकारे केली त्याने मी प्रभावित झाले आहे. लोकांना त्रास झाला, तरीही त्यातून मार्ग काढत जो प्रयत्न झाला तो प्रशंसनीय असल्याचे वक्तव्य राजदूतांनी केले.

भारत-ऑस्ट्रेलिया हे दोघेही एकमेकांच्या जवळ आले असून द्विपक्षीय व्यापार देखील वाढला आहे. संरक्षण संबंध आमच्या यशस्वी कामगिरींपैकी एक आहे. दोन्ही देश हिंदी महासागरात सागरी सुरक्षेकरता एकत्र आले आहेत. त्याचबरोबर दोघेही लोकशाहीप्रधान देश असून त्यांना स्थायित्व हवे असल्याचे प्रतिपादन सिद्धू यांनी केले.

Related posts: