|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » देशाचे भवितव्य न्यायालयांच्या क्षमतेवर अवलंबून

देशाचे भवितव्य न्यायालयांच्या क्षमतेवर अवलंबून 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

नवी आणि अवघड आव्हाने स्वीकारण्याच्या न्यायव्यवस्थेच्या क्षमतेवरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे, असे महत्वपूर्ण प्रतिपादन देशाचे मावळते सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी केले आहे. ते मंगळवारी त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या निरोप समारंभात बोलत होते. या कार्यक्रमाला भावी सरन्यायाधीश जे. एस. खेहर उपस्थित होते.

सध्या न्यायव्यवस्थेसमोर महत्वाची आव्हाने उभी आहेत. ती स्वीकारण्यासाठी न्यायव्यवस्था सुसज्ज असणे आवश्यक आहे. भारतीय न्यायव्यवस्था नेहमीच खंबीर आणि निर्भय राहिली आहे. यापुढेही ती तशीच राहील आणि लोकांच्या तिच्याकडून असणाऱया अपेक्षा पूर्ण करत राहील. न्यायदेवतेची प्रतिष्ठा भविष्यकाळातही सुरक्षित राहील अशी मी प्रार्थना करतो, असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.

न्या. टी. एस. ठाकूर हे असामान्य व्यक्ती आहेत. त्यांच्या सरन्यायाधीशपदाच्या काळात न्यायव्यवस्थेने उत्तम प्रगती केली, असे गौरवोद्गार भावी सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांनी काढले. या प्रसंगी सर्वोच्च न्यायालय वकील संघटनेच्या अध्यक्षांचेही भाषण झाले. मात्र या कार्यक्रमाला न्या. जे. चेमलेश्वर यांची अनुपस्थिती जाणवली. न्या. चेमलेश्वर यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या कॉलेजियम पद्धतीला विरोध केला होता. 

 

Related posts: