|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महिलांनी पारंपरिक विचासरणी बदलावी

महिलांनी पारंपरिक विचासरणी बदलावी 

प्रतिनिधी/ निपाणी

आजच्या महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेत चूल आणि मूल ही पारंपरिक विचारसरणी बदलावी आणि सामाजिक कार्यासाठी तत्पर रहावे,  असे प्रतिपादन संध्या वराळे यांनी केले. येथील आयएमए हॉलमध्ये निपाणी  महिला बहुजन मोर्चाच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 186 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. स्वागत मोहिनी कांबळे यांनी केले. यावेळी वराळे म्हणाल्या, भारतात स्त्राr भ्रुणहत्येविरोधात सुरुवातीला लढा देणारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात सावित्रीबाईंचा मोलाचा वाटा आहे. अत्याचारित ब्राम्हण स्त्राr काशिबाई यांच्या मुलास दत्तक घेऊन त्याला वाचविण्याचे महान कार्य फुले दाम्पत्याने केले. पती ज्योतिराव फुले यांच्या अंत्यविधीवेळी विरोध झुगारुन सावित्रीबाईंनी विधी पूर्ण केले.

ज्योतिरावांच्या निधनानंतर यांच्या पश्चात सत्यशोधक समाजाची धुरा सावित्रीबाईंनी सांभाळली. अनिष्ट प्रथेविरुद्ध लढा देणाऱया तसेच मुलींच्या शिक्षणासाठी आपले जीवन व्यतीत केलेल्या सावित्रीबाईंचा आदर्श घेऊन महिलांनी वाटचाल करावी, असे सांगितले.

याप्रसंगी अनुजा कुरळुपे, अर्चना श्रीखंडे, कलावती कांबळे, स्नेहल म्हेत्रा, रोहिणी  शितोळे, सुरेघा जयकर, वंदना काळे, सारिका कांबळे, अन्नपूर्णा मड्डे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पूजा कांबळे, उषा श्रीखंडे, सुरेखा शितोळे, वैशाली कांबळे, सोनाली घाले, सुमित्रा घाले, सुंगंधा कीर्तने, करिश्मा कांबळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या. माधुरी वराळे यांनी सूत्रसंचालन केले तर शर्मिला कांबळे यांनी आभार मानले.