|Thursday, September 19, 2019
You are here: Home » क्रिडा » नादालचा विजय, निशिकोरीचा संघर्ष

नादालचा विजय, निशिकोरीचा संघर्ष 

वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन

येथे सुरू असलेल्या ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या राफेल नादालने विजयी प्रारंभ करताना अलेक्झांडर डोल्गोपोलोव्हचा पराभव केला. जपानच्या निशिकोरीला मात्र विजय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला.

नादालला या स्पर्धेत पाचवे मानांकन असून डोल्गोपोलोव्हवर त्याने 6-3, 6-3 अशी मात केली. त्याची पुढील लढत जर्मनीच्या मिशा झ्वेरेव्हशी होईल. जपानच्या निशिकोरीला जॅरेड डोनाल्डसनवर विजय मिळविण्यासाठी झगडावे लागले. निशिकोरीने अडीच तास रंगलेली ही लढत 4-6, 6-4, 6-3 अशी जिंकून उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. त्याची उपांत्यपूर्व लढत डेव्हिड फेरर किंवा थॉम्पसन यापैकी एकाशी होईल.

महिला एकेरीत चौथ्या मानांकित गार्बिन मुगुरुझाने एक मॅचपॉईंट वाचवत रशियाच्या दारिया कासात्किनाचा 7-5, 3-6, 7-6 (9-7) असा पराभव करून शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. ऑस्ट्रेलियाच्या 16 वर्षीय आयाव्हाने अमेरिकेच्या बेथनी मॅटेक सँड्सला 2-6, 6-3, 6-4 असा पराभवाचा धक्का दिला. जागतिक सहाव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाने अमेरिकेच्या आशिया मुहम्मदचा 6-1, 6-4 असा फडशा पाडला. उपांत्यपूर्व फेरीत तिची लढत रॉबर्टा व्हिन्सी किंवा जपानची मिसाकी दोई यापैकी एकीशी होईल.