|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » असहाय्य ‘विजय’ला लाभला मैत्रीचा हात!

असहाय्य ‘विजय’ला लाभला मैत्रीचा हात! 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

    आपल्या मित्राच्या आजारावर होणाऱया प्रचंड खर्चात फूल ना फूलाची पाकळी या हेतूने मदतीसाठी अनेक चिमुकले हात पुढे सरसावल्याचे चित्र दिसले. आपली आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही सखारामबापू खराडे ज्यु. कॉलेजच्या मुलांनी मदत गोळा करून 25 हजारांचे अर्थसहाय्य विजय जाधव या रूग्ण मित्राला केले.

   या मदतीमध्ये वाढ व्हावी यासाठी या मुलांच्या विनंतीला मान देऊन प्रतिज्ञा नाटय़रंग संस्थेतर्फे ‘मिशन ममी डॅडी’ व ‘अवॉर्ड’ या नाटकांचे सलग प्रयोग सोमवारी दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे सादर करण्यात आले. यावेळी अरूंधती महाडिक, सूरेश शिपूरकर, डॉ. असलकर, प्रतिज्ञा संस्थेचे प्रशांत जोशी, कॉलेजचे प्राचार्य पी.डी. काटकर, चिल्लर पार्टीचे मिलिंद यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. अरूंधती महाडिक यांनी देखील यावेळी विजयला अर्थसहाय्य केले.

  शिवाजी मराठा हायस्कूल व सखारामबापू खराडे ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणाऱया विजय जाधव हा विद्यार्थी ग्रोथ हार्मोन्स ऑफ डिफिशियन्सी या आजाराने ग्रस्त आहे. घरची परिस्थिती बेताची असलेल्या विजयला औषधांचा दररोजचा खर्च 1500 रूपये इतका येत असल्याने त्याच्या अशा परिस्थितीत मदत म्हणून ना नफा ना तोटा या तत्त्वावर हा प्रयोग झाला. यावेळी सूरेश शिपूरकर, अरूंधती महाडिक, डॉ. अलासकर, प्रशांत जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अंकिता पोवार हिने, प्रास्ताविक स्नेहल शहापूरकर हिने तर आभार आरती लुगडे या विद्यार्थिनीने मानले.

Related posts: